श्री मोहिनीराज

मोहिनीराज मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा गावात स्थित आहे. हे मंदीर भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित आहे. मंदिराचे बांधकाम आहे आणि तो उंच अधिष्ठानावर स्थित आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर द्वारपालांच्या मूर्ती आहेत. सभामंडपातील वितान वाद्य वाजवणाऱ्या व पुत्तलीकांनी तोलून धरलेले आहेत. मंदिरात उंच सिंहासनावर श्री मोहिनीराजाची मूर्ती आहे. गर्भगृहात शेजारी श्री लक्ष्मीची मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशद्वार उत्तरेकडे असून शंख, चक्र, गदा, अमृताची कूपी, नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, डोक्यावर मुकुट, पायात तोडे व पितांबर परिधान केलेल्या मूर्ती असतात.

poojaphoto photo murti mohinirajphoto MOHINIRAJYATRA